आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारेगाव:दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण

मारेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मारेगाव विश्रामगृह परिसरातील हृदयद्रावक घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट,परिसरात हळहळ

दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शहरातील विश्रामगृह परिसरात शनिवार, दि. २० मार्चला सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले वय ३० वर्ष आणि श्रुती उमेश उलमाले वय दीड वर्ष रा. प्रभाग क्रमांक १२, मारेगाव असे मृत आई व चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मारेगाव शहरातील विश्रामगृहा मागे उमेश उलमाले हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारला रात्री रूममध्ये उमेश, त्याची पत्नी कोमल व दोन मुली झोपी गेले. अशातच रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास उमेश याला अचानक जाग आली. त्यावेळी त्याला रूममध्ये पत्नी व लहान मुलगी दिसली नाही म्हणून त्याने शोधाशोध सुरू केली. मात्र ती आणि चिमुकली मुलगी कुठेच आढळून आली नाही. अखेर शनिवारी सकाळी उमेश उलमाले याने याबाबत मारेगाव पोलिसांना कळवले.

दीड वर्षाच्या चिमुकलीसह कोमल यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर जमलेली गर्दी.
दीड वर्षाच्या चिमुकलीसह कोमल यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर जमलेली गर्दी.

दरम्यान सर्वत्र शोधा शोध घेत असताना आश्रम शाळा परिसरात असलेल्या विजय थेरे यांच्या शेतातील विहिरीजवळ चपला आढळून आल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावरून विहिरीत गळ टाकून शोधल्यानंतर दीड वर्षीय श्रृतीचा मृतदेह व काही वेळात आई कोमल हिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने मारेगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मात्र या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही पोलिसांना कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. असे काय घडले की,कोमल यांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागले.

तालुक्यात या पूर्वी घडल्या दोन घटना
मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथे अश्याच प्रकारे एक घटना घडली होती. त्यानंतर तालुक्यातील म्हैस दोडका येथील रहिवाशी असलेली मोनाली पारखी या महिलेने तिच्या तीन वर्षीय मुलाला पोटाला बांधून गावानजीकच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटना आजपर्यंत तालुक्यातील नागरिक विसरले नसतानाच ही तालुक्यात तिसरी घटना घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...