आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्युची नोंद:विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या‎‎

उमरखेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहत्या घरातील पंख्याला लटकून एका‎ विवाहितेने गळफास घेवुन आत्महत्या‎ केली. ही गुरूवार दि. २ मार्च रोजी दुपारी ३‎ वाजता दरम्यान स्थानिक बोरबन परिसरात‎ घडली. काजल रवि जाधव वय ३५ वर्षे‎ असे मृत विवाहीत महिलेचे नाव आहे.‎ या प्रकरणात मृत हिचा सासरा‎ आत्माराम जाधव यांनी पोलिसांत दिलेल्या‎ तक्रारीनुसार घटनेच्या आदल्या दिवशी‎ रात्री १ वाजता दिपक भरणे व संतोष भरणे‎ यांना घराजवळ पाहून त्यांना हटकले‎ असता त्यांनी मृत महिलेबाबत बोलून‎ घराजवळ भांडण केले. याची माहिती‎ त्यांनी सकाळी बाहेरगावी राहणारा मुलगा‎ रवि याला दिली. त्यावरुन रवी सकाळी ११‎ वाजता घरी आला. त्यानंतर या‎ प्रकरणावरून मृत काजल हिला‎ समजावण्याचा प्रयत्न झाला.

अशातच‎ दुपारी ४ वर्षीय मुलगी व एक २ वर्षाचा‎ मुलगा ही दोन्ही मुले अंगणात खेळत‎ असतांना काजलने बेडरूम मधील‎ पंख्याला दोर बांधून गळफास घेवुन‎ आत्महत्या केली. मृत काजल हिला दोन‎ लहान चिमुकली मुले असल्याने परिसरात‎ हळहळ व्यक्त होत आहे. या मृत्यूचे कारण‎ रात्रीला घडलेला प्रकार आहे की, दुसरे‎ काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले‎ नाही. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय‎ पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी भेट‎ देवुन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी‎ अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...