आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:लोणबेहळ येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

आर्णी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील प्रवीण साहेबराव मोरे हा युवा शेतकरी २ सप्टेंबर रोजी घरुन निघुन गेल्याची तक्रार आर्णी पोलिस ठाण्यात प्रवीण चा लहान भाऊ नितीन मोरे यांनी दिली.प्रवीण हा महाराज असल्यामुळे तो कुठल्या कार्यक्रमात तर गेले नसेल या आशेने त्याचा शोधा शोधत्याचे नातेवाईक घेत होते.

अशातच लोणबेहळ येथील शेतकरी शांतीलाल जयस्वाल हे आपल्या शेतात दि. ८ सप्टंेबरला फवारणी करीता गेले असता. विहिरीत व्यक्ती असल्याचे दिसले. त्याच वेळी लोणबेहळ येथील पोलिस पाटील विजय बुटले यांना फोन करुन कळवले असता, ती व्यक्ती शेतकरी प्रवीण मोरे असल्याचे त्याचे काका ऊत्तम मोरे यांनी ओळख पटविली. याबाबत आत्महत्या केल्याची तक्रार आर्णी पोलिस ठाण्यात उत्तम मोरे यांनी दिली. प्रवीण यांच्याकडे तीन एकर जमीन असून,त्याच्या पश्चात कुटुंबात एक मुलगी एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. जमादार चव्हाण हे चौकशी करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...