आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन ते तीन वर्षांपासून मुबलक पावसाळा होत असल्याने शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बी व उन्हाळी हंगामात सिंचनासाठी भरारी मिळाली आहे. पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याने यंदा तालुक्यात ८ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी हंगामी कामात गुंतले आहेत. शेतकऱ्यांच्या घामामुळे यंदाचा उन्हाळी हंगाम चांगलाच बहरला आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीन व मूग पिकाचा पेरा वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यात रब्बी हंगामात गहू २२६४ हेक्टर क्षेत्रात व हरभरा ८२८६ हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांसह ११८१४ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता. तर उन्हाळी हंगामातील सोयाबीन, मूग, ज्वारी, तीळ, मका, कांदा भाजीपाला, सूर्यफूल व भुईमूग पिकांचा पेरा वाढला आहे. यंदा ८२३५ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी हंगाम असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. तालुक्यातील मन, तोरणा, मस, ज्ञानगंगा व ढोरपगाव यासह इतर छोट्या मोठ्या धरणांतील पाण्यामुळे सिंचन क्षेत्र वाढले आहे. खरीप व रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
तालुक्यातील पीकनिहाय झालेला पेरा
सोयाबीन ६७०, तीळ १६३, भुईमूग १८५४, सूर्यफूल १४८, मका १२६०, कांदा २६२०, भाजीपाला ८७४, ज्वारी ४८ व ५९७ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.