आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:अनाथांना देणार आधार : डॉ. उकंडे

दिग्रस20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेरणा शिष्यवृत्तीसाठी 25 जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विष्णू उकंडे प्रतिष्ठान व प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने आई वडील नसलेल्या व आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षणापासून दुर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच अनाथ विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उदात्त हेतूने प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विष्णू उकंडे यांच्या वतीने दिग्रस, आर्णी, घाटंजी तालुक्यातील अनाथ मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते.

त्याप्रमाणे याही वर्षी प्रेरणा शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अनाथ मुलांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्या स्वप्नांपुढे काही दिसत नाही. आपली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी माणूस नेहमी आपण किती दु:खी आहोत हेच पाहतो. आपलेच रडगाणे गात राहतो. स्वतः चाच विचार करतो. पण जेंव्हा तो इतरांचे दु:ख न्याहाळतो तेंव्हा त्याला कळते की त्याच्या वाटेला आलेले दु:ख हे फार कमी आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून डॉ. विष्णू उकंडे यांनी दिग्रस, आर्णी व घाटंजी तालुक्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. पोरकी झालेली मुले आपलीशी केली. आणी त्यांच्या जीवनात आनंदाचे बिजं रोवले.

अनाथ मुले जेंव्हा शिक्षण घेऊन मोठी होइल व आपले विश्व निर्माण करतील. तेव्हा त्यांच्या जीवनात किती ही मोठे संकट आले तरी, ती डगमगणार नाही, ह्या उदात्त हेतुने डॉ. विष्णू उकंडे यांनी प्रेरणा शिष्यवृत्ती योजनेची निर्मिती केली आहे. तरी समाजसेवक तथा ग्रामसेवक यांनी सदर अनाथ बालकांची माहिती २५ जून पर्यंत नितीन सोनुलकर यांच्याकडे देण्यात यावी असे आवाहन डॉ. विष्णू उकंडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...