आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिजीट:एसपींची अवधुतवाडी ठाण्यात सरप्राइज व्हिजीट

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. पवन बन्सोड रूजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात सरप्राइज व्हीजिट देणे सुरू केले आहे. गुरूवार, दि. १० नोव्हेंबरला डॉ. पवन बन्सोड यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात भेट दिली. यावेळी संपूर्ण ठाण्याची पाहणी करीत अधिकाऱ्यांना पेंडीग गुन्हे, डिटेक्शनवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर नवे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी काही दिवसांपूर्वीच आढावा बैठक घेतली होती. यावेळी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना ठाणेदारांना दिल्या होत्या.

अपर पोलिस अधीक्षकांनीही घेतला होता आढावा
काही दिवसांपूर्वी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात सायंकाळी अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी सरप्राइज भेट दिली होती. यावेळी त्यांनी वाढत्या गुन्ह्यांचाआढावा घेतला होता. त्यात मोठ्या घरफोड्या उघडकीस आणण्यासोबतच पेंडींग गुन्हे, फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...