आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:ढाणकीलगतच्या सोईट शिवारात बिबट्याचा झाला संशयास्पद मृत्यू

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या सोईट शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सोईट येथील देविदास माघाडे यांच्या शेताजवळील नाल्यामध्ये सदर बिबट्याचा मृतदेह आढळला. गावातीलच एका शेळ्या चालणाऱ्या संदीप माघाडे या मुलाने नाल्यातून दुर्गंधी येत असल्याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता हा प्रकार लक्षात आला. त्याने गावातील नागरिकांना या संदर्भात माहिती दिली. ही माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला कळविली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन तपासणी सुरू केली. या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळलेले नाही. बीबट्याच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी त्याच ठिकाणी करण्यात आली. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर महागडे यांच्या शेतामध्ये बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...