आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:पेढी येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

महागाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहितेचा गावालगत असलेल्या विहिरीत मृतदेह आढळल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शारदा अरविंद कांबळे (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे. शारदाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला असा खळबळजनक आरोप तिच्या आई वडीलांनी केला आहे. शारदाचा खूनच करण्यात आल्याची फिर्याद त्यांनी महागाव पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

२००९ मध्ये शारदाचा विवाह पेढी येथील अरविंद कांबळे याच्याशी झाला. या दाम्पत्याला १० वर्ष वयाची १ मुलगी आहे. पेढी गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत शारदाचा मृतदेह असल्याची वार्ता बुधवारी गावात पसरली. तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. किंवा तिचा काटा काढून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. शारदा हिला फेफरे (फिट) हा आजार होता असा आरोप सासरची मंडळी करत आहेत.

या शिवाय ती कर्करोगाने ग्रस्त असल्याचेही सांगितले जात आहे. शारदा पाणी आणायला गेली असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची सारवासारव पोलिसांकडून करण्यात येत आहे. शारदा हिचे आईवडील व नातेवाइकांनी मात्र शारदाला फेफरे किंवा कर्करोग असल्याची बाब फेटाळली असून तिच्या खुनाच्या घटनेला वळण देण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...