आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मफलर:स्वेटर, मफलर, जॅकेटसह हातमोजे यंदा दहा टक्क्यांनी महागले

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा पावसाळा उशिरा संपला असून, गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाताना गरम कपडे, मफलर, कानटोपी वापरताना नागरिक दिसू लागले आहे. तसेच शहरात गरम कपड्यांची दुकानेही थाटण्यास सुरुवात झाली आहे. यंदा गरम कपड्यांमध्ये पारंपरिकसह असंख्य नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यात बुलबुल, फैदर, मखमल वूल या नवीन प्रकारांना खरेदीदारांकडून पसंती मिळत आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गरम कपड्यांच्या किमती १० टक्के वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शहरातील आझाद मैदानावर विक्रेत्यांनी गरम कपड्यांची दुकाने थाटली आहेत. यात स्वेटरमध्ये १५० ते ९०० रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच जॅकेट व इतर काही वेगळ्या प्रकारच्या गरम कपड्यांच्या किमती २ ते ३ हजार दरम्यान ही पाहायला मिळतात. यंदा बाजारात जॅकेट, स्वेटर्स, बिनबाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठीचे जॅकेट्स आदी प्रकारचे गरम कपडे उपलब्ध आहेत; मात्र यात बुलबुल वूल, फैदर वूल, मखमल वूल या प्रकाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच मफलर, टोप्या, कानटोप्या, कानपट्ट्याही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आझाद मैदानावर दरवर्षी ३५च्या वर महाराष्ट्रीयन व तिबेटियनची दुकाने थाटली जातात. यंदा मात्र, तिबेटियन व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यात आघाडी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...