आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोकड लंपास:यवतमाळमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील रोकड लंपास

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील २० हजार रुपयाची रोकड लंपास केली. ही घटना शहरातील महादेव मंदिर परिसरातील आकाश ड्रेसेस समोर बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे आता महिला चोरट्यांची टोळी बसस्थानक पाठोपाठ शहरातील मार्केटमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अलमासनगर येथील अर्शीया सलीम शेख (२२) या तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, अलमास नगर येथील अर्शीया सलीम शेख हिच्या आईच्या पर्समधील २० हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केली. शहरातील बसस्थानक परिसरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाली होती. त्यानंतर वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी बसस्थानकांतील चौकीत पोलिस कर्मचारी तैनात केले. त्यामूळे आता त्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील मार्केट टार्गेट केले आहे.

तपासणी सुरू असल्याचे सांगत वृद्धाची फसवणूक
शहरातील आर्णी मार्गावर असलेल्या डॉ. भडके रुग्णालय परिसरात एका वृद्धाला अज्ञात व्यक्तीने समोर तपासणी होत असल्याचे सांगत थांबवले. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्याची चैन आणि अंगठी असा एकूण २६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल रुमालात टाकण्यात सांगितला. त्यानंतर तो रुमाल वृद्धाला देवून त्यात दागिने असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी राजेश्वर काप्रतवार (६४) रा. आकृती अपार्टमेंट यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...