आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:वाळू माफियाकडून तलाठ्याला मारहाण; कळंब तालुक्यातील सावरगाव येथील घटना

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील सावरगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी तलाठी मिलिंद नामदेव लोहत रा. सावरगाव ता. कळंब यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज महादेव भगत आणि मंथन मनोज भगत दोघेही रा. सावरगाव ता. कळंब यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कळंब तालुक्यातील सावरगाव येथील तलाठी मिलिंद लोहत हे सोमवारी सायंकाळी गावातील सावरगाव ते परसोडी मार्गावर असलेल्या एका दुकानात उभे होते. यावेळी भरधाव ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना त्यांना आढळला. त्यामुळे तलाठी लोहत यांनी तो ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने तो ट्रॅक्टर न थांबवता सावरगाव येथील स्वत:च्या घरासमोर खाली केला. हा सर्व प्रकार लोहत यांनी आपल्या मोबाइलमध्ये टिपला असताना त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढ्यावरच तस्कर थांबले नाही, तर त्यांनी तलाठी लोहत यांना लाथाबुक्याने मारहाण करणे सुरू केले. या वेळी तलाठी लोहत यांचा चष्मा फोडून त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी लोहत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी त्या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात कळंब पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...