आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथक नोंदणी:तालुकास्तरीय स्काऊट गाईड उद्‌बोधन वर्ग व पथक नोंदणी

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत स्काऊटस् गाईडस् व शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय उद्बोधनवर्ग व पथक नोंदणी कार्यशाळा संत गाडगेबाबा आश्रम शाळा उमरी येथे दिनांक ३ ऑगस्ट रोजी उत्साहात झाली.

या कार्यशाळेला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय इंगोले, विस्तार अधिकारी भाऊ मुळे, आश्रम शाळा उमरीचे मुख्याध्यापक दळवी सर, जिल्हा संघटक (स्काऊट) गजानन गायकवाड, जिल्हा संघटक (गाईड) श्रीमती कविता पवार, नागोरावजी काकपुरे उपस्थित होते. तीस वर्ष घाटंजी तालुकाप्रमुख असलेले व नुकतेच पांढरकवडा प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदावर रुजू, झाल्या बद्दल संजय इंगोले, विस्तार अधिकारी भाऊ मुळे, दळवी सर तसेच अरुण कोवे यांचा उत्कृष्ट स्काऊट गाईड सेवेकरता सत्कार करण्यात आला.

पांढरकवडा तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण १५० शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. सदर कार्यशाळेत स्काऊट गाईड कब- बुलबुल १८९ पथक नोंदणी करण्यात आली तसेच राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा, सेवा प्रकल्प, समुदाय विकास कार्यक्रम, राष्ट्रीय जांबोरी राजस्थान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अशा विविध विषयां संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यालयीन कर्मचारी प्रतिमा चौधरी, सुरज गोईकर, हेमलता वाढीवे, दिशा सिंगारकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख दिनेश घाटोळ यांनी तर आभार प्रदर्शन नीलेश गोपतवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता तालुकास्तरीय सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...