आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहन:तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, मैदान फुल आवाजही घुमणार ; विद्यार्थिनींचा सहभाग राहणार

कळंब6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत येथील जीवन दीप आश्रमशाळेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. या निमित्ताने मैदान फुलण्यासोबतच खेळाडूंना मिळणाऱ्या प्रोत्साहनाने आवाजही घुमणार आहे. या स्पर्धेत १४, १६ व १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग राहणार आहे. २४ नोव्हेंबरला कबड्डी, २५ ला खो-खो व व्हॉलीबॉल, २६ रोजी वैयक्तिक खेळ आणि २८ नोव्हेंबर रोजी बुद्धीबळ स्पर्धा होईल.

स्पर्धेसाठी क्रीडा संयोजक तथा मुख्याध्यापक श्रीकांत चिंचुलकार यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका कल्पना भोयर, क्रीडा शिक्षक राजेश झाडे, शंकर जवंजाळ, रेणुका मडावी, वैशाली पद्मावार, मोना ताटे, प्रफुल्ल बिलाणे, अरविंद ताकसांडे, मनोज बनारसे, नीलिमा डोंगरे, विनोद कुमरे, राहुल बागवे, किरण पोजगे, रूपेश राठोड, कैलास बुबन, मुकुंद हेटे हेटे, सचिन चौधरी, अभिजित देशमुख, सतीश काळे, मोहन कुकलवार आदी प्रयत्नरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...