आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आयटीआय उत्तीर्णसाठी तंत्रनिकेतनची दारे खुली; कोणताही ट्रेड असलेले विद्यार्थी घेताहेत तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्षात प्रवेश

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात आयटीआयकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी अडीच ते तीन हजारांच्या घरात आहे. तर तंत्रनिकेतनकडे वळणारे बाराशेच्या घरात आहेत. दरम्यान, यावर्षी आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता तंत्रनिकेतनच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या जिल्ह्यात दोनही तंत्रनिकेतनमध्ये द्वितीय वर्षात प्रवेशाची लगबग सुरू आहे.

आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आज पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ ऑनलाइन प्रणाली पोर्टल नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

यावेळी पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असणार आहेत. पॉलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी मागील वर्षी कोरोनामुळे कमी करण्यात आली होती.

यंदा मात्र एक फेरी वाढविण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर तंत्रनिकेतनचे स्वप्न पाहणाऱ्या मात्र मेरिटची अडचण असल्याने प्रवेश मिळवता आला नाही. आयटीआयमध्ये उपलब्ध ट्रेड पूर्ण करून पुन्हा विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ पासून ही सुविधा देण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात शासकीय दोन विद्यालये आहेत. यामध्ये जवळपास सहाशे विद्यार्थी प्रवेश क्षमता आहेत.

तंत्रनिकेतनसाठी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
डॉ. आर. पी. मोगरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन