आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाने ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्याचे घोषित केल्यानंतरही जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे पगार अद्यापही झाले नाही. परिणामी, राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासनाला मंगळवारी प्रत्येक तालुक्यातून एक रुपयांची मनीऑर्डर पाठवण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. आंदोलनास जिल्हाभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर यांनी दिली.
सातव्या वेतन आयोगाच्या तिन्ही हप्त्याची रक्कम शिक्षक सोडून इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, शिक्षकांच्या खात्यात अद्याप दुसरा आणि तिसरा हप्ता जमा झाली नाही. सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपदानाची रक्कमही अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बुधवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभर शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले.
दरम्यान, संतप्त झालेल्या शिक्षकांनी प्रत्येक तालुक्यातील एक रूपया शासनाला मनिऑर्डरच्या स्वरूपात पाठवून निषेध नोंदविला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर, किशोर सरोदे, मुकेश भोयर, महिला आघाडी प्रमुख सुनीता जतकर, पुंडलिक रेकलवार, प्रफुल्ल पुंडकर, मिलिंद देशपांडे, राधेश्याम चेले, मारोती काळेकर, नदीम पटेल, यशवंत काळे, सुभाष लोहकरे, सुभाष धांदे, रणजित डेरे, दर्शन बेंद्रे, श्रीकृष्ण फुपरे यासह इतरही शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.