आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा विरोध:वर्गात फोटो लावण्यास शिक्षकांचा विरोध

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्गात शिक्षकांचे पेपरवर फोटो लावण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले आहे. अधिवेशनात आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल केलेले अपमानजनक वक्तव्याचा काळ्या फिती लावून प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. वर्गात फोटो लावण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी घेऊन शिक्षक भारतीच्या वतीने सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली.

राज्यभरातील शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आम्हाला शिकवू द्या अभियान चालविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा नंबर एकवर आणण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम देण्याची गरज आहे. असे असताना शिक्षण विभाग शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करीत आहे. विविध शैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर लादून शिक्षकाचा वेळ वर्गात शिकवण्यापेक्षा इतर कामांमध्ये जात आहे. शैक्षणिक दर्जा कमी झाल्यानंतर खापर शिक्षकांच्या माथ्यावर फोडून अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे. शिक्षक भारतीच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. त्याचप्रामणे वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...