आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपारिक सण:धाडी बंजारा तांडा येथे तीज उत्सव उत्साहात

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंजारा समाजाचा पारंपारिक सण तिज धाडी बंजारा तांडा येथे शुक्रवारी, दि. १९ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गाने हिरवा शालू पांघरल्या वर जन्माष्टमीच्या नऊ दिवसापूर्वी वारूळाची माती टोपल्यांमध्ये घेवून गव्हांचे बिजारोपण केले जाते. समृद्धी व मांगल्याचे प्रतिक गौरीची उपमा याला दिली जाते.

कृष्ण जन्माष्टमीला या गव्हांकुरित टोपल्यांची विधिवत पुजा करून वाजत - गाजत पारंपरिक नाच पद्धतीने बंजारा समाज हा उत्सव साजरा करतो. धाडी बंजारा तांडा येथे कृष्णजन्माष्टमी व तिज या कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी तांडयामधील धाडी बंजारा समाज यात सहभाग घेतला. सामाजिक व धार्मिक एकतेचे हे प्रतिक असलेल्या कार्यक्रमात भानुदास भानावत, सिमा काळे, माया शेरे, प्रविण रूडे, लक्ष्मण रूडे, गणेश रत्ने, मोतीलाल शेरे, शैलेश भानवे, संजय रूडे, शाम भानावत, संजय भानावत, दिनेश रूडे, प्रा. स्वप्नील सगणे, अरविंद रूडे, व तांडयामधील संपूर्ण महिला भगनी उपस्थित होत्या. बेले लेआऊट ते वाघाडी या दरम्यान मिरवणूक निघून सायंकाळी सहा वाजता तिजचे विसर्जन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...