आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक:अवैध वाळूउपसा करणाऱ्यांविरुद्ध तहसीलदार आक्रमक; जेसीबी घेऊन पोहोचले घाटावर

बाभुळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - वर्धा - अमरावती सिमेवर असणाऱ्या वर्धा व बेंबळा नदीपात्रात चांगल्याप्रतिची वाळू आहे. वाळू घाट लिलाव होण्याअगोदरच वाळूचोर वारेमाप अवैधरीत्या वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला आहे. अवैधरीत्या वाळू उपसा होण्यास प्रतिबंध लागावा यासाठी चक्क बाभुळगावचे तहसीलदार विठ्ठल कुंभरे जेसीबी मशीन घेवून वाळू घाटावर पोहचले. उपसा करण्यासाठी चोरट्यांनी तयार केलेले वाहतुकीचे रस्ते या जेसीबीद्वारे उद्ध्वस्त केले.

शनिवार, दि. १९ नोव्हेंबरला तालुक्यातील विविध वाळू घाटावर जाऊन ही कारवाई केली आहे. तहसीलदाराच्या आक्रमक पवित्र्यामुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.बाभुळगाव तालुका हा तीन जिल्ह्याच्या सिमेवर जोडणारा तालुका आहे. या तालुक्याच्या सिमेवर बेंबळा व वर्धा नदी प्रवाहीत आहे. यंदाच्या वर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याने घाट वाळूने तुडूंब भरलेले आहे.

अन्यथा मजुरांवरही करणार फौजदारी गुन्हे दाखल
वाळू चोरट्यांकडून मिळणाऱ्या काही पैशामुळे काही मजुरवर्ग मध्यरात्रीच्या सुमारास वाळूचा उपसा करतात. अन् नदीच्या काठावर वाळूचे संचय करतात. हे अवैधकाम मजुरांनीही बंद करावे अन्यथा त्याच्यावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल. यापुढे तालुक्यात अवैध उत्खननचे गैरप्रकार महसुलविभाग सहन करून घेणार नाही. वाळू चोरट्यांना कडक कारवाईच्या सामोरे जावे लागले.विठ्ठल कुंभरे, तहसीलदार, बाभुळगाव.

कळंबच्या तहसीलदारांनी जप्त केली ट्रेझर बोट
कळंब | वर्धा नदीपात्रातील एकाही रेती घाटाचा अजून लिलाव झाला नसताना रात्रीतून बिनबोभाट ट्रेझर बोटीने अवैध रेती उपसा सुरू आहे. माध्यमांनी रेती उपशाचा भंडाफोड केल्याने १८ नोव्हेंबरला वर्धा नदीवरील शिरपूर घाटातून ट्रेझर बोट जप्त करुन रात्री ९ वाजता तहसीलदारांनी तहसील कार्यालयात आणली.

बातम्या आणखी आहेत...