आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक कार्यक्रमांचे आयोजन:विडुळ येथील उमामहेश्वर गणेश मंडळाद्वारे दहा दिवस विविध लोकोपयोगी कार्यक्रम

उमरखेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विडुळ येथील उमामहेश्वर गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवाच्या दहा दिवसात दररोज लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना गावकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.यात वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन तसेच परिसर स्वच्छता अभियान, सामान्य ज्ञान स्पर्धा, शिक्षक दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार व बक्षीस वितरण शिवाय रोग निदान व रक्तदान शिबिर तसेच मतदान कार्डाशी आधार कार्ड जोडणी शिबिर यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात दोन वयोगट करण्यात आले होते. त्यात पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशी विभागणी करण्यात आली होती.

त्यात पाचवी ते आठवीच्या जवळपास १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर नववी ते बारावीच्या ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर सामान्य ज्ञान स्पर्धेच्या प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात येणार असून त्यात भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह उमामहेश्वर मंडळ आणि विद्यार्थी संघ विडूळ यांचे संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...