आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाईल जबरीने हिसकावणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीकडून गुरूवारी पोलिसांनी तब्बल ४९ मोबाईल आणि पाच दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील दहा मोबाईल हस्तगत करण्यात अवधुतवाडी पोलिसांना यश आले असून या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहरातील शिवाजी ग्राउंड परिसरातील गोविंद टेकाळे या विद्यार्थ्याचा दोन दुचाकीस्वार युवकांनी जबरीने हिसकावून पळ काढला होता. यावेळी गोविंद आणि त्याच्या मित्राने दुचाकीस्वारांचा पाठलाग करीत त्यांना पकडले.
या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी त्या दुचाकीस्वार दोघांची चौकशी केली. यावेळी त्या अल्पवयीन मुलांच्या टोळीने इतर साथीदारांच्या मदतीने लुटमारी करीत मोबाईल लंपास केल्याची कबूली दिली. गुरूवारी अवधुतवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून ४९ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पाच दुचाकी असा एकूण ७ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर शुक्रवारी याच अल्पवयीन मुलांच्या टोळीकडून आणखी दहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, पथकातील आशिष भुसारी, रूपेश धोबळे, बबलू पठाण, प्रशांत राठोड, उमेश शिंदे, रशीद शेख यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.