आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाला माणसाची भाषा समजणारा समूह म्हणजे माणुसकीची भिंततर्फे अत्यंत गरीब परिस्थिती असणाऱ्या पार्डी येथील वंदना रामकिशन शिंगारे ह्या दि. ५ जुलैपासून नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, असे त्यांचे पती रामकिशन शिंगारे यांनी कळवले आहे.
माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन कडे दहा हजार रुपये आजाराकरिता अत्यंत गरज असल्याची मागणी केली. त्या मागणीवरून माणुसकीची भिंततर्फे मदत मिळाल्याने रूग्णांकडुन आभार व्यक्त केल्या जात आहे.तालुक्यातील पार्डी येथे राहणारे रामकिशन शिंगारे यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांचा शेत मजुरी करून उदर निर्वाह सुरू आहे. त्यांना केमो करीता दहा हजार रुपये नितांत आवश्यकता असल्याचे पाहताच पुण्यातील शिव प्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक परशराम नरवाडे, माणुसकीची भिंत सदस्य व रुग्ण मित्र फाउंडेशनचे शांतीसागर इंगोले यांनी परिस्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन विचारपूस केली. त्यानंतर माणुसकीची भिंतकडुन सोशल मिडीया ग्रुपवर मेसेज टाकून ग्रुपमधील सदस्यांना आवाहन करून दहा हजार रुपयाची मदत त्या गरजू महिलेस केली. ग्रुपमधील मदत करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.