आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांची शिक्षा:अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा ; ज्ञानेश्वर राठोड आरोपीचे नाव

यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली. हा निर्णय वि अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवार, दि. १७ जूनला ठोठावण्यात आला. ज्ञानेश्वर राठोड वय २७ वर्ष रा. बोधेगाव ता. दारव्हा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दारव्हा तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ज्ञानेश्वर राठोड या युवकाने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर दि. २२ डिसेंबरला २०१८ रोजी पळवून नेवून जबरदस्तीने वांरवार अत्याचार केले. या प्रकरणी दि. २३ मे रोजी अल्पवयीन मुलीने कुटूंबीयांसह दारव्हा पोलिस ठाण्यात येवून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली, यात ती गर्भवती असल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून ज्ञानेश्वर राठोड याला अटक केली. त्यानंतर परिक्षणाच्या अहवालाप्रमाणे मुलीला झालेले नवजात बाळद हे आरोपी राठोड याच्याकडून झाल्याचे सिध्द झाले.

विनयभंग ,३ वर्ष शिक्षा यवतमाळ शहरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रमानिमित्त आलेल्या तरूणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली. हा निर्णय शुक्रवार, दि. १७ जूनला अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी सुनावला. अक्षय चांदेकर वय २७ वर्ष रा. विठोली ता. दिग्रस असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी घडली होती.

बातम्या आणखी आहेत...