आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचा परवाना रद्द:महिला बँकेच्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डबघाईस आलेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ जानेवारी रोजी समाप्त होणार आहे. या संदर्भांचे आदेश सोमवार, २ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्गमित केले आहे. तद्नंतर बँकेवर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदार सभासदांकडील वसुली सुरू आहे.

बँकेची परिस्थिती लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सोमवार, २ जानेवारी रोजी अवासायकानी निर्गमित केले आहे. या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती ३१ जानेवारीपासून होणार आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .

बातम्या आणखी आहेत...