आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनेही फिटनेसमध्ये तंदुरुस्त:शहरात वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी टेस्टिंग स्टेशन

यवतमाळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षानुवर्षे वाहन चालवण्याचा अनुभव असूनही सहजासहजी लक्षात न येणाऱ्या आणि अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या वाहनातील दोषांमुळेही अनेकदा अपघात घडतात. यामुळे वाहनेही फिटनेसमध्ये तंदुरुस्त असण्याची गरज आहे. भारतात पहिल्यांदाच नाशिक येथे परीक्षण केंद्र सुरू झाले आहे. आता काही महिन्यात यवतमाळ मध्येही ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. ही यंत्रणा बसवणारी एक टीम त्यासाठी जागेची पाहणी करुन गेले आहेत.

ही यंत्रणा सुरू करण्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून हालचाली करण्यात येत आहेत. वाहनांमधील दोष शोधणारी ऑटोमोटेड टेस्टिंग स्टेशन ही स्वयंचलित वाहन तपासणी यंत्रणा होणार असल्याने अपघातांची संख्या कमी होण्यासह फिटनेस तपासणीसाठी लागणाऱ्या वेळेतही नागरिकांची बचत होणार आहे. प्रदूषण कमी करण्यासह अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने आता सरकारकडून आणखी एक नियम लागू करण्यात येत आहे.

या नियमानुसार आता सर्व वाहनधारकांना ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन मधूनच वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. या अनुषंगाने हळूहळू विविध जिल्ह्यांमध्ये ही यंत्रणा सुरू करण्याची प्रक्रिया राबवल्या जात आहे. काही दिवसांपूर्वीच या परीक्षण केंद्रासाठी माहिती पाठवण्यात आली आहे. यात किती वाहनांचे दररोज फिटनेस होत असते, किती ठिकाणी ट्रॅक करण्यासारखी जागा आहे, शालेय व खासगी किती वाहने आहेत, हे परीक्षण केंद्र झाल्यास काय पारदर्शकता येईल, या विविध बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

ब्रेक, लायनर, मेटल बॉडीची होते तपासणी
वाहनांमधील दोष शोधणारी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमध्ये टायर, हेडलाइट्स, मेटल बॉडी, ब्रेक, लायनर आदी वाहनांचे भाग तपासले जाणार आहेत. यात वाहने तपासणीचा अहवाल ऑनलाइन येणार आहे. वाहने खऱ्या अर्थाने फिट असावीतव

पथक पाहणी करून गेले
ही यंत्रणा बसवण्यासाठी पथक येऊन पाहणी करुन गेले आहेत. त्यामुळे ही यंत्रणा आपल्याकडेही कार्यान्वित होणार आहे. वाहनांमधील दोषांमुळे होणारे अपघात रोखण्यास मदत व्हावी हा यंत्रणेचा उद्देश आहे.. ज्ञानेश्वर हिरडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...