आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरगड शिवारातील मृतदेह:तो मृतदेह हिंगणघाटच्या तरुणीचा; शवविच्छेदनाच्या अहवालाकडे पोलिसांचे लक्ष

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासुन काही अंतरावर घाटंजी मार्गावर असलेल्या सावरगड शिवारात असलेल्या शेख लुकमान यांच्या शेतामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळुन आला. मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस असलेल्या या घटनेने संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. नितु बंडुजी सावध वय २५ वर्षे रा. हिंगणघाट असे मृत मुलीचे नाव आहे. ती सुमारे दोन वर्षापासून यवतमाळात येथे राहून पोलिस भरतीची तयारी करीत होती. इंदीरा नगर भोसा पोलिस भरती सराव प्रशिक्षण केंद्रात तीचा सराव सुरू होता. ती यवतमाळ येथील अवधूत वाडी परिसरात किरायाने रूम करून पोलिस भरतीची तयारी करीत होती.

रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ती तीच्या आईसोबत बोलली होती. त्यानंतर तीचा फोन बंद येत होता. त्यामुळे तीच्या आईने नितुच्या मैत्रिणीला फोन केला असता ती पार्टीसाठी निघुन गेल्याचे सांगितले होते. तेव्हापासुन ती बेपत्ता असल्याने तीच्या आईने तीचा शोध सुरू केला होता.दरम्यान या प्रकरणात देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी मारहाण, गळा आवळणे किंवा तसेच विषारी औषधाचा अंश आढळून आला नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तीचा व्हीसेरा नागपुर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...