आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल विभाग अॅक्शन मोडवर आला असून रेती तस्करांवर धडक कारवाई करून तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. महागाव तालुक्यातील पैनगंगा पुस, शिप या नद्यांसह नाले, ओढ्यांमधून रेती तस्करी जोमात सुरू असून यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडून शासनाचे नुकसान होत असल्याबाबत सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील रेती तस्करी रोखण्याचे आदेश दिल्यानंतर तालुका महसूल प्रशासन अॅ क्शन मोडवर आले असून तहसीलदार विश्वंभर राणे, नायब तहसीलदार डॉ. संतोष आदमुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाकडून तालुक्यातील रेती घाटांवरील रस्त्यांवर नाल्या खोदून वाहतुक बंद करणे, तसेच पथकामार्फत रेती घाटांवर गस्त वाढवण्यात आल्याने रेती तस्करीस आळा निर्माण झाला आहे. तालुका महसूल प्रशासन अचानक अॅ क्शन मोडवर आल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून रेती तस्कर सैरभैर झाले आहेत.
पथकामार्फत रेती घाटांवर गस्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशाने महागाव तालुक्यातील रेती घाटावरून होणाऱ्या रेती तस्करीला पायबंद करण्यासाठी फुल सावंगी ते टेंभी व करंजखेड ते महागाव मार्गावर दोन चौकी निर्माण करण्यात आल्या. तसेच पथक निर्माण करण्यात येवुन या पथकामार्फत रेती घाटांवर गस्त घालण्यात येत असुन या पथक गस्त करीत असतांना अंबोडा येथे एक ट्रॅक्टर रेती तस्करी करीत असतांना आढळून आला असता त्यावर कारवाई करण्यात आली. विश्वंभर राणे, तहसीलदार, महागाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.