आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विविध कला, क्रीडा, स्पर्धांनी रंगला वार्षिकोत्सव‎

मंगरूळपीर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेत‎ २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वार्षिक‎ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. उद्घाटन‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री‎ पार्वतीबाई नाईक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे‎ उपाध्यक्ष संतोष राठोड, उदघाटक व प्रमुख‎ मार्गदर्शक म्हणून तालुका दिवाणी‎ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. के. मेश्राम,‎ सहायक न्यायाधीश आर. एस. मानकर व‎ मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील‎ हूड उपस्थित होते.‎

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मातोश्री‎ पार्वतीबाई नाईक कन्या शाळा व कनिष्ठ‎ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता पवार, अॅड.‎ सरकाळे, शिक्षक-पालक संघाच्या अध्यक्षा‎ रुपाली गादेकर यांची उपस्थिती होती. यावेळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण‎ विकासासाठी असे उपक्रम आवश्यक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असल्याचे मत व्यक्त करत, अभ्यासाकडे‎ दुर्लक्ष होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी‎ घ्यावी, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ संतोष राठोड यांनी केले.

यानंतर उपस्थित‎ अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.‎ या वार्षिक उत्सवादरम्यान विविध क्रीडा‎ स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,‎ वाद-विवाद स्पर्धा तसेच नृत्य व गायन स्पर्धा‎ पार पडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ‎ शिक्षक आर. एच. रघुवंशी यांनी,‎ सूत्रसंचालन एन. आर. राठोड यांनी, तर‎ आभार प्रदर्शन एम. डब्लू. भगत यांनी केले.‎ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एल. एस. ठाकरे,‎ मंगला आंधळे, जयश्री राठोड, निरंजन पवार,‎ बाळू भगत, विनायक पवार, शिवा बुधे, रवि‎ जाधव, भारत मनवर, रवि खाडे आदींनी‎ परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ प्राचार्य संतोष राठोड, प्राचार्या सुनीता पवार‎ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...