आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक घटना:खेड येथील व्यक्तीचा विहिरीत आढळला मृतदेह

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आरंभी येथील शेत शिवारातील विहिरीत खेड येथील एका व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला. ही घटना बुधवार दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.नूरसिंग नामदेव राठोड (वय-२७) रा. खेड, ता. आर्णी असे मृत व्यक्तीचे नावे आहे. आरंभी शेत-शिवारातील विहिरीत मृतदेह आढळुन येताच या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोरीच्या सहाय्याने मृतदेह विहिरीबाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला. मृतकाने विहिरीत उडी घेतली की, काही घातपात झाला हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विशाल बोरकर, सुजित जाधव, शालीक राठोड करीत आहे. मृत व्यक्ती ने आत्महत्या केली की हा घातपात आहे हे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

बातम्या आणखी आहेत...