आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्रस तालुक्याच्या दाभा शिवारातील घटना:शेतकरी पुत्राचा विहिरीत आढळला मृतदेह

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील वडगाव (आरंभी) येथील एका ४५ वर्षीय शेतकरी पुत्राचा मृतदेह दाभा शेतशिवारातील विहिरीत तरंगताना आढळून आला. ही खळबळजनक घटना शनिवार, १ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता उघडकीस आली. किशोर काळू राठोड वय ४५ रा. वडगाव (आरंभी) असे मृत शेतकरी पुत्राचे नाव आहे.वडगाव येथील किशोर राठोड हा वडिलांच्या नावे असलेल्या ४ एकर शेतीत सोयाबीन, कपाशीचा वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी ३० सप्टेंबरच्या रात्री ७ वाजता जागलीकरिता शेतात गेला होता.

अचानक १ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह दाभा शेत शिवारातील प्रदीप शिवराम राठोड यांच्या विहिरीत तरंगताना आढळला. याबाबत पोलिस पाटील विठ्ठल राठोड यांनी दिग्रस पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

त्यानंतर विहिरीतून खाटेला दोर बांधून मृतदेह पाण्याबाहेर काढून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. शेती वडिलांच्या नावे असून किशोर ती शेती वहीत करत होता. मृतकाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक गुणवंत गोटे, ब्रम्हानंद टाले, रवींद्र जगताप करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...