आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध मोहीम:धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह चार तासांच्या शोधमोहिमेनंतर काढला बाहेर

वनोजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गोप सावंगी येथील माोर्णा नदीच्या प्रकल्पात ३० ऑगस्ट रोजी एक २५ वर्षीय युवक बुडाला होता. चार तास शोध मोहीम राबवून त्याचा मृतदेह शोधण्यात आला.मालेगाव पोलिस स्टेशनचे निरीक्षक वानखडे आणि एपीआय वाघ यांनी श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक प्रा. बापूराव डोंगरे यांना या घटनेची माहिती दिली आणि शोध मोहीम राबवण्यासाठी पाचारण केले. यानंतर प्रा. डोंगरे यांनी सर्व सुरक्षा साहित्यांसोबत घटनास्थळी पथकाला रवाना केले. पथकाच्या सदस्यांनी शोध मोहीम सुरू केली. २० फुट खोल पाण्यात शोध घेण्यात आला. पण ३ तासांच्या प्रयत्नानंतरही मृतदेह आढळला नाही.

यानंतर स्थानिकांच्या मदतीने काटेरी तारांच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली आणि ११:४५ वाजता काटेरी ताराला भागवत काळे यांचा मृतदेह अडकून वर आला. या शोध मोहिमेत पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अध्यक्ष दीपक सदाफळे तसेच नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील सुनील कल्ले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. घटनास्थळी तलाठी, पोलिस कर्मचारी आदि उपस्थित होते. या शोध मोहिमेमध्ये साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे प्रवीण गावंडे, सुमीत राठोड, सचिन राठोड, विलास नवघरे, पुनेश राठोड, अभिषेक ठाकरे, ज्ञानेश्वर खडसे, गणेश शिंदे, आदित्य इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाचे मेडशी येथील राजेश साठे, नथ्थुभवानी वाले मंगरूळपीर येथील अतुल उमाळे, लखन खोडे, शुभम भोपळे, घटनास्थळी होते.

बातम्या आणखी आहेत...