आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:दोन दिवसांनंतर आढळला मृतदेह; तलावात कुजलेल्या अवस्थेत आढळून

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील दत्तापूर येथील ३२ वर्षीय युवक गुरुदेव टेकाम हा विजया दशमीचे दिवशी सायंकाळी तलावात बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बोटीने रेस्क्यू ऑपरेशन करीत होते. अखेर शुक्रवारी सकाळच्या सुमारास अखेर गुरुदेव टेकाम याचा मृतदेह तलावात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला

यवतमाळातील डोर्ली येथील मुळचा रहिवासी असलेला ३२ वर्षीय युवक गुरुदेव टेकाम हा गवंडी कामावर मोल मजुरीने मिस्त्री काम करीत होता. अश्यात गेल्या एक वर्षापासून तो कळंब तालुक्यातील दत्तापूर येथे सासरा वसंता पिंपळखुटे याच्याकडेच राहात होता. घरगुती वादातून विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी दत्तापूर तलावाजवळ जाऊन पाण्यात उतरला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता.

घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शेकडो नागरिकांसह कळंब पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर एनडीआरएफची टीम बोलाने बोटीद्वारे तलावामध्ये शोध घेतला. मात्र गुरूदेव आढळून आला नव्हता. अश्यात अखेर शुक्रवारी सकाळी गुरूदेव याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

यावेळी कळंब पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अभय चौथनकर, जमादार संतोष ढाकरगे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता कळंब ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...