आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या आवारात बांधकाम करण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण विभागाच्या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. तब्बल पाच कोटी रूपये खर्चून बांधकाम केलेल्या या सुसज्ज इमारतीला आता वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. सध्या फर्निचरचे काम सुरू असून, या इमारतीत तीन विभाग एकत्रीत येणार आहेत. महाविकास आघाडीतील तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास भवन निर्मितीचे उद्दिष्ट होते. या इमारतीत महिला व बालविकास विभागांतर्गत असणारी सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यात येणार होती. यात प्रामुख्याने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग, महिला आर्थीक विकास महामंडळ, असे तीन कार्यालय एकाच इमारतीत आणण्याचे नियोजित होते.
त्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करावा, असे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीला लागूनच महिला व बालविकास भवनाच्या इमारतीची मुहूर्तमेढ होत आहे. सन २०२१ मध्ये बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. सुसज्ज अशा इमारतीचे बांधकाम आता पूर्णत्वास आले आहे. सध्या इमारतीतील फर्निचरचे काम चालू असल्याची माहिती आहे, परंतू एव्हढ्या सुसज्ज इमारतीत अद्याप पर्यंत वीज कनेक्शन घेण्यात आले नाही. आता विद्युत जोडणीच नसल्याने कार्यालय कसे चालू करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतू त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता महिला व बालविकास भवनच्या इमारतीचे काम आता अंतीम टप्प्यात आहे.विज कनेक्शन घेतल्यानंतर ह्या ठिकाणी तिन्ही कार्यालय एकत्रीत येतील.तत्पूर्व ी इमारतीचे लोकार्पण करणे गरजेचे आहे.नुकतीच पदवीधर मतदार संघाची आचार संहिता संपली असून,येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे.या निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वीच लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.