आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत लोटून ठार:मुलाला लोटले विहिरीत

बाभूळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभुळगाव तालुक्यातील दाभा येथे आठ दिवसापूर्वी रहायला आलेल्या दुसऱ्या घरच्या एका मुलाला सावत्र बापाने विहिरीत लोटून ठार केल्याची घटना रविवार दि. १ जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली आहे. राहुल शंकर अंजीकर वय ७ वर्ष असे मृत मुलाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी क्रुर झालेल्या निर्दयी सावत्र बाप देविदास नामदेव कोडापे वय ३८ वर्ष रा. दाभा याला बेड्या ठोकल्या आहे.

बाभुळगाव तालुक्यातील दाभा येथील रहिवासी देविदास कोडापे यांनी माधुरी नामक तिसरी पत्नी केली. माधुरी शंकर अंजीकर हीचा पुर्वीचा पती यांच्यापासून राहुल नामक मुलगा व दोन मुलीसह आठ दिवसापूर्वी दाभा येथे रहायला आली होती. आई माधुरी कोडापे ही कधी गावात हजर रहायची तर कधी बाहेर जायची. ती घरी नसतांना सावत्र मुलगा राहुल हा अगोदरच्या पती पासून झाला असल्याने मागील तीन दिवसापासून राहुल यास देविदास सतत मारहाण करीत होता.

दि. १ जानेवारीला तुरीच्या शेतात जायचे म्हणून दाभा येथील राजेश्वर ठाकरे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत याला ढकलून राहुल याचा देविदास याने जीव घेतला. या प्रकरणी देविदास कोडापे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...