आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेत विद्यार्थिनी चमकल्या‎:चिमुकल्यांचे आकाशकंदील उजळले‎

यवतमाळ‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहणी येथील जिल्हा परिषद‎ शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या‎ पर्वावर आकाशकंदील व भेटकार्ड‎ तयार केली. त्यांच्या कलागुणांना‎ वाव देण्यासाठी शाळेतर्फे ही खास‎ स्पर्धा आयोजित करण्यात आली‎ होती.‎ कार्यानुभव क्षेत्रांतर्गत‎ पर्यावरणपूरक उत्कृष्ट व रंगीबेरंगी‎ आकाशकंदील व विविध प्रकारची‎ आकर्षक भेटकार्ड विद्यार्थ्यांनी‎ आपल्या कल्पकतेतून तयार केली.‎ संयोजन मुख्याध्यापक राजू ढोके‎ यांनी केले.

त्याचे शाळेत प्रदर्शन‎ भरवण्यात आले.‎ या प्रदर्शनातून नंदिनी मारशेटवार,‎ आदित्य लडके, योग नंदिनी‎ निरवासे, अंबिका राठोड, प्रेरणा‎ रूपनर यांचे आकाशकंदील, तर‎ विजय मुम्माडवार या शिक्षकांनी‎ आदिल शेख, प्रियंका जाधव,‎ प्रतीक्षा वाघमारे, जागृती मारशेटवार,‎ मोहिनी गवळी, पूजा जाधव यांची‎ भेटकार्ड बक्षिसासाठी पात्र ठरली.‎ प्रदर्शनीचे केले होते.‎ या स्पर्धेकरिता शाळेतील शिक्षकवृंद‎ मेघा गुंडावार, शीतल मेश्राम, शिल्पा‎ कळंभे, ऋतुजा जोरी, शरद चौधरी,‎ राजेश्वर वानखडे, नरेंद्र अस्वार,‎ परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी‎ आनंद उत्सव साजरा केला.‎

बातम्या आणखी आहेत...