आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीओ रस्त्यावर:अतिक्रमण काढण्यासाठी सीओ स्वत: उतरले रस्त्यावर

यवतमाळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम शनिवारी सुटीच्या दिवशी देखील सुरू होती. त्यात तिसऱ्या दिवशीच्या मोहिमेत मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत दत्त चौक परिसरासह आर्णी मार्गावरील मोठ्या व्यावसायिकांचीही अतिक्रमणे काढुन फेकली.

मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी पालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी दोन दिवसाच्या मोहिमेत अतिक्रमण न काढणाऱ्यांचे अतिक्रमण थेट काढुन फेकले. त्यानंतर त्यांनी नेताजी चौक ते दत्त चौक आणि दत्त चौक ते बसस्थानक चौक या भागात मोहीम राबवत लहान मोठ्या सर्व व्यावसायिकांची अतिक्रमणे काढली.

दरम्यान दुपारी ही मोहिम आर्णी मार्गाने पुढे गेली. त्यात आर्णी नाका परिसरापर्यंत असलेली सर्व अतिक्रमणे काढुन टाकण्यात आली. दत्त चौक परिसरातील अतिक्रमणे काढल्याने त्या भागात प्रत्यक्षात रस्ते किती मोठे आहेत हे नागरिकांना अनुभवता आले. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येइल असा इशारा देण्यात आला.

शहरातील सर्व भागात मोहीम
शहरात व्यावसायिकांनी व्यवसाय करावा मात्र तो करताना सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण यापुढे खपवून घेतले जाणार नाही. शहरातील कुठल्याही भागात सार्वजनिक मालमत्तांवर अतिक्रमण करणारा तो लहान व्यक्ती असो की, मोठा त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील सर्व भागात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यात कुणालाही माफ करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपले अतिक्रमण काढुन या मोहिमेस सहकार्य करावे. दादाराव डोल्हारकर, मुख्याधिकारी, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...