आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न खोल्यांत भरतात चार वर्ग:नेकनामपूर येथील शाळेच्या खोल्यांची अवस्था दयनीय

संग्रामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील नेकनामपूर येथील शाळा खोल्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खोल्यांवरील टिनपत्रे जंगले आहेत. त्यामुळे या टिनपत्र्यात पावसाचे पाणी गळत आहे. यावरही कळस म्हणजे दोन खोल्यांत चार वर्ग भरतात. त्यातच जुनाट टिनपत्र्यामुळे खोल्या गळत असल्यामुळे वर्ग कोठे भरवावा, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. शिक्षण विभाागाने याकडे लक्ष देवून नादुरूस्त खोल्यांची डागडुजी करावी, अशी मागणी पालक करत आहेत.

तालुक्यातील नेकनामपूर गावाची लोकसंख्या ६७० असुन गावात जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. या शाळेत गावातील चिमुकले शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून या शाळेच्या खोल्यांची दयनीय अवस्था झाली असून दोन खोल्या नादुस्त आहेत. तत्कालीन सहकार नेते जनार्दन चोपडे यांच्यासह ग्रामस्थांच्या प्रयत्नाने जि.प. मराठी शाळा खोल्या मंजूर होऊन १९८६ -८७ मध्ये या शाळेची स्थापना झाली. पूर्वी शाळेसाठी एकच खोली होती. काही कालावधी नंतर लगतच दुसऱ्या खोलीचे बांधकाम करण्यात आले. परंतु शाळा खोल्यांचे बांधकाम होऊन जवळपास पस्तीस वर्ष झाले आहेत. तेव्हापासून शिक्षण विभागाने या खोल्याची साधी डागडुजी केली नाही. परिणामी खोल्यांतील फरशा तुटल्या असून टीन पत्रे गंजली आहे. त्यातून पावसाचे पाणी झिरपत आहे. यावरही कळस म्हणजे त्या दोन खोल्यांपैकी एक खोलीची तर कठीण अवस्था झाली आहे.

दोन शिक्षक दोन खोल्या व चार तुकड्या असल्याने वर्ग कोठे भरावा, असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन चार वर्गासाठी किमान तीन मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी पालक करत आहे

शाळेसाठी नवीन खोल्या मंजूर करा, अन्यथा आंदोलन करू
मागील पस्तीस वर्षांपूर्वी दोन खोल्याचे बांधकाम झाल्यापासून त्याची साधी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे खोल्यांची डागडुजी करून छतावरील टिन पत्रे बदलण्यात यावे. दोन खोल्यांत १ ते ४ पर्यंत तुकड्या भरत असल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र शिक्षण मिळावे म्हणून नवीन खोल्या मंजुर करण्यात याव्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
गोपाल पाटील, शिवसेना शाखा प्रमुख नेकनामपूर

बातम्या आणखी आहेत...