आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालक मोठ्या प्रमाणावर‎ त्रास:वर्धा शहरातील खड्डे‎ बुजवण्यासाठी बांधकाम‎ विभाग शोधतोय मुहूर्त‎

वर्धा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौंदर्यींकरणाच्या उद्देशाने वर्धा‎ शहरातील अनेक रस्ते खोदून‎ ठेवण्यात आले. मात्र या रस्त्याच्या‎ मधोमध पडलेले खड्डे‎ बुजवण्यासाठी बांधकाम विभागाला‎ अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने‎ किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढत‎ आहे.‎ वर्धा शहरातील विविध कामे‎ प्रगतीपथावर असून, रस्त्याचे‎ सिमेंट- काॅँक्रिटीकरणासाठी‎ रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर‎ खोदकाम करण्यात आले होते. रस्ते‎ झाले मात्र, रस्त्याच्या मधोमध खड्डे‎ पडलेले असून, त्यावर अद्याप गट्टू‎ लावण्यात आले नाहीत. रस्त्यावर‎ खड्डे पडलेले असल्याने,‎ वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर‎ त्रास सहन करावा लागत आहे.‎

तसेच पाठदुखी, मानेचा त्रास व‎ इतर आजारांना रस्त्यावरील खड्डे‎ आमंत्रण देत आहेत. परंतु बांधकाम‎ विभागाचे याकडे दुर्लक्ष होत‎ असल्याचे दिसत आहे.‎ याबाबत वर्धा बांधकाम‎ विभागाचे मतीन नळगिरे यांनी‎ रस्त्याचे काम सुरु असून, रस्त्याच्या‎ मधोमध पडलेल्या खड्डयांमध्ये‎ आठवडाभरात गट्टू लावण्यात‎ येणार असल्याचे सांगितले.‎