आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या‎ टाकीचे काम निकृष्ठ दर्जाचे‎:कंत्राट एकाचे काम करतोय दुसराच, चौकशी करा‎

महागाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन अंतर्गत बांधकाम‎ करण्यात येत असलेल्या पाण्याच्या‎ टाकीचे काम निकृष्ठ दर्जाचे‎ करण्यात येत असुन त्यामुळे‎ शासनाच्या निधीचा अपव्यय होत‎ असल्याने या कामाची चौकशी‎ करून या कामाचे देयक काढण्यात‎ येवु नये, अशी मागणी सामाजिक‎ कार्यकर्ते गोपाल राठोड यांनी केली‎ आहे.‎ महागाव तालुक्यातील साई (ई)‎ येथे नागरिकांना पिण्याचे पाणी‎ मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी‎ जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी‎ ३८ लाख रुपयांचा निधी मंजुर‎ करण्यात आला. या कामाचे कंत्राट‎पांढरकर नामक कंत्राटदाराला‎ मिळाले. परंतु त्यांनी स्वतः काम न‎ करता दुसऱ्याच कंत्राटदाराला काम‎ करण्यास दिले आहे. त्यामुळे कंत्राट‎ देताना घालुन दिलेल्या अटी व‎ शर्थीला फाट्यावर मारण्याचे काम‎ कंत्राटदाराने केले आहे. सद्या या‎ योजनेतील पाण्याच्या टाकीचे‎ बांधकाम चालू असुन यासाठी‎ लागणारे साहित्य माती मिश्रीत रेती,‎ गिट्टी, सिमेंट हे निकृष्ठ दर्जाचे‎ वापरण्यात येत आहे.‎