आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृदुंग-2023’ हा वार्षिक स्नेहसंमेलन:नाईक कृषी महाविद्यालयाचे‎ स्नेहसंमेलन उत्साहात‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव र्नाइक कृषी जैवतंत्रज्ञान‎ महाविद्यालयात २३ ते २५ जानेवारी दरम्यान‎ ‘मृदुंग-२०२३’ हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा‎ कार्यक्रम उत्साहात पार पडला. २५‎ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचा समारोपीय‎ व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे‎ सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार,‎ प्रमुख अतिथी विद्यापीठ कुलगुरू डॉ. एस.‎ जी. गडाख, तसेच अतिथी डॉ. एस. एस.‎ माने, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे,‎ विद्यार्थी प्रतिनिधी अन्वेश गाडे, पियुष‎ गोयल, देवांश शर्मा विद्यार्थीनी प्रतिनिधी‎ किर्ती सिन्हा उपस्थित होते.‎

विद्यापीठ कुलगुरू डॉ. एस. जी. गडाख‎ मार्गदर्शन करतांना म्हणाले की,‎ स्नेहसंमेलनाने तणावमुक्त आनंदी जीवन‎ जगता येते. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील क्षमता‎ ओळखून ध्येय ठरवावे. मन व शरीर सुदृढ‎ ठेवून सांस्कृतिक, बौँध्दीक व सर्वांगीण‎ विकास साधता येतो. विद्यार्थ्यानी रोज‎ योगा अभ्यासाचा व धावण्याचा सराव‎ नियमित करावा असे आवाहन केले.‎

विविध स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी होवून‎ उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करावी तसेच‎ विद्यार्थ्यानी शेतीविषयक संशोधन करावे‎ असे मार्गदर्शन विद्यापीठ कुलगुरू यांनी‎ केले. डॉ. माने यांनी महाविद्यालयातील‎ विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे‎ कौतुक केले. स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी‎ अनुभवलेले क्षण, त्यांच्यातील प्रदर्शीत‎ झालेले सुप्तगुण आणि मिळालेले‎ व्यासपीठ तसेच महाविद्यालयातील‎ विद्यार्थ्याची शैक्षणिक व क्रीडा या क्षेत्रात‎ भविष्यात विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत मोलाचे‎ मार्गदर्शन केले.

डॉ. पार्लावार यांनी‎ महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा व उंच‎ भरारीचा आलेख सादर केला.‎ तसेचभविष्यामध्ये महाविद्यालयाने‎ करावयाची प्रगतीबाबतचे प्रतिपादन केले.‎ याप्रसंगी कृषि वसंत वार्षिक अंक‎ प्रकाशितकरण्यात आले. तसेच ‘स्टुंडंट‎ ऑफ दि ईयर अवार्ड’ विद्यार्थी पियूष‎ गोयल व अनेक विविध क्षेत्रात मिळालेल‎ बक्षिसांचेवितरण विद्यापीठ कुलगुरू डॉ.‎ एस. गडाख व डॉ. एस. एस. माने यांचे हस्ते‎ प्रदान करण्यात आले.

महाविद्यालयीन तीन‎ दिवसीय स्नेह संमेलनामध्ये पाक कला,‎ वक्तृत्व स्पर्धा, गायन,नृत्य, वेषभुषा,‎ कविता, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे व‎ आनंद मेळवाचे आयोजन करण्यात आले‎ होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. अंजली‎ गहरवार यांनी केले. संचालन तनया‎ गजभिये व सृष्टी पाहूणे या विद्यार्थीनीने‎ केले. तर आभार कीती सिन्हा या‎ विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमाला‎ महाविद्यालयातील प्रा. धिरज वसुले, डॉ.‎ रवींद्र सातभाई, डॉ. प्रशांत शिंगोटे, डॉ.‎ संदेश बांगर, मंगेश शेटे, सहायक‎ कुलसचिव रूपेश राऊत, डॉ. हेमंत वाघ,‎ डॉ. रोशन शिंदे, डॉ. प्रशांत काळे, डॉ.‎ प्रतिक पुसदकर, डॉ. पी. के. प्रधान,‎ एकनाथ भंकाळे, पंकज जैन, अस्मिता‎ पाटील आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...