आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान. शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं. त्या काळात आणि त्याच्या आधी निजमशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्य सूर्याला ग्रासलं होतं. आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती.म्हणून आजचा दिवस इतिहासातील अभूतपूर्व व महत्त्वाचा क्षण होता तसेच खऱ्या अर्थाने भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली, असे मत विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.यानंतर आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व इतिहास विषयाचे गाढे अभ्यासक निवृत्ती ढोडरे यांनी शिवरायांच्या ऐतिहासिक लढायांचे रोमहर्षक वर्णन करून शिवराय हे जणू रयतेचे दैवत होते हे विविध प्रसंगातून व्यक्त केले. यानंतर शाळेचे पवन इंगोले,अशोक मोरेकर,आनंद बोरकर यांनी शिवरायांच्या पराक्रमावर आधारित सुमधुर पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पुढे बोलतांना बंग यांनी सांगीतले की महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ दिवशी राज्याभिषेक झाला आणि आपल्या स्वराज्याला छत्रपती मिळाले. याच ऐतिहासिक घटनेचं महत्त्व दृढ करण्यासाठी शिवप्रेमी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन सोहळा म्हणून साजरा करतात. आजच्याच दिवशी १६७४ ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पदाधिकारी नितीन राऊत, विलास राऊत व शिक्षक अमित वानखडे, युवराज मोहेकर, श्रीनिवास देशपांडे, अमोल वानखडे, अमोल भंडारकर, राजेश तळोकर, नावेद, पारस वारकरी, कृष्णकुमार शर्मा यांनी परिश्रम घेतले तसेच आभार प्रदर्शन हेमंत डुबे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.