आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासराईत गुन्हेगाराच्या एलसीबीने मुसक्या आवळत सात गुन्हे उघडकीस आणले. ही कारवाई बुधवार, १ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली असून यात पाच घरफोड्या आणि दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अक्षय मसराम (२८) रा. नेताजी नगर, यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून शेख अकबर शेख मुसा रा. कलगाव ता. दिग्रस, शेख अख्तर शेख मुक्तार रा. पुसद आणि लखन राठोड (२५) रा. मोरगव्हाण ता. दिग्रस अशी त्याच्या फरार साथीदारांची नावे आहे.
शहरात एका पाठोपाठ एक घरफोडी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे घडतच आहे. या प्रकरणातील चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एलसीबी पथकाने वेगवेगळी पथक तैनात करीत शोधमोहीम सुरू केली होती. अशात बुधवारी आर्णी मार्गावरील वनवासी मारोती मंदिराजवळ सराईत चोरटा अक्षय मसराम हा चोरीची अॅक्टीवा घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यावरून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तीन मित्रांच्या मदतीने आर्णी शहरात तीन तर अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोड्या केल्याची कबूली दिली. त्याचबरोबर लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोपेड वाहने लंपास केल्याचेही पोलिसांसमोर कबूल केले. या प्रकरणी एलसीबी पथकाने एलईडी टिव्ही, तीन मोपेड वाहन, एक अमेरिकन टुरिस्ट बॅग, एक मोबाईल आणि घरफोडी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.