आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसांपूर्वी केळापूर तालुक्यातील सखी बुद्रुक येथील तलावात एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला होता. यात घातपात असल्याचा संशय मृताच्या पत्नीकडून व्यक्त केला होता. मंगळवारी ह्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, शेतीच्या वादातून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. भीमराव अर्जुन मेश्राम (४२) रा. सखी बुद्रुक, असे मारेकऱ्याचे नाव आहे. बाबाराव दौलत मेश्राम (४०) रा. सखी बुद्रुक, ता. केळापूर असे मृताचे नाव आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी केळापूर तालुक्यातील सखी बुद्रुक येथे शनिवारी गावालगतच्या तलावात मृतदेह असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. शेतकऱ्याने सदर माहिती गावातील लोकांना दिली. घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तो मृतदेह गावातील बाबाराव दौलत मेश्राम यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...