आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्या:नालीचे घाण पाणी शिरले घरात‎

फुलसावंगीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक ६‎ मधील रहिवाशी अमोल ढवळे यांनी‎ घरासमोर असलेल्या सार्वजनिक नालीचे‎ बांधकाम करून त्यावर रापटा टाकून सदरील‎ जाण्या येण्याचा मार्ग सुरळीत करावा, यासाठी‎ गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायतला‎ निवेदन देवून पाठपुरावा केला.‎ प्रसंगी ग्राम सभेमध्ये देखील त्यांनी हाच‎ विषय रेटून धरला होता. यावर ग्रामपंचायतने‎ तोडगा काढत तात्पुरत्या स्वरूपाचे त्या‎ नालीवर सिमेंटचे पाईप व मुरूम टाकून‎ सदरील विषय निकाली काढण्याचा प्रयत्न‎ केला.

परंतु त्या टाकलेल्या पाईप व मुरमामुळे‎ त्या नालींचे घाण पाणी व्यवस्थितपणे वाहून‎ जाईल असे वाटत असताना उलट त्याच‎ ठिकाणी साचून रहात आहे.त्यामुळे‎ परिसरातील अनेक घरांना या साचलेल्या घाण‎ पाण्यामुळे नाहक ञास सहन करावा लागत‎ आहे.अनेक परिवारांचे आरोग्य या साचलेल्या‎ घाण पाण्यामुळे धोक्यात आले आहे.त्यांना‎ मलेरिया सारख्या आजारांना समोर जावे‎ लागत आहे.

सदरील रस्त्यावरून चालणे‎ देखील कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे‎ सदरील पाईप काढून त्या जागी पक्या‎ स्वरूपाची सिमेंट ची नाली बांधून त्यावर‎ रापटा टाकावा व घरासमोर साचलेले पाणी‎ सुरळीत करावे अशी मागणी अमोल ढवळे‎ यांनी निवेदनाच्या माध्यमातून गटविकास‎ अधिकारी प.स महागाव यांच्याकडे केली‎ आहे. या गंभीर विषयाची दखल वेळीच न‎ घेतल्या २६ जानेवारीपासून ग्रामपंचायत‎ कार्यालयाच्या समोर उपोषण करणार‎ असल्याचा इशारा अमोल ढवळे यांनी‎ निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...