आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात भाजपचे पाच विधानसभा आमदार आणि एका विधान परिषद आमदारांसह तब्बल सहा आमदार आहेत. असे असतानाही जिल्ह्यात भापजच्या वाट्याला एकही मंत्रीपद आले नसल्याने भाजप बँकफुटवर जात आहे. अशा स्थितीत येत्या मंत्रीमंडळ विस्तारात सहा भाजप आमदारांच्या जिल्ह्याला मंत्रीपदाचा डोज देवुन भाजपचे हात बळकट करावे अशी आशा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा भाजपने लावुन ठेवली आहे. त्यातच अधीवेशनाच्या तोंडावर मंत्रीमंडळ विस्तराच्या चर्चा सुरू असल्याने या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीवर कुरघोडी करीत भाजप आणि शिंदे गटाने हातमिळवणी करीत सत्ता काबीज केली. सत्ता स्थापण झाल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. त्यानंतर े केवळ १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या पहिल्या मंत्रीमंडळात आमदार संजय राठोड यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली. याचवेळी जिल्ह्यातील भाजपलाही मंत्रीमंडळाची संधी देण्यात येईल अशी शक्यता होती.
मात्र भाजपच्या वतीने प्रथम फळीतील भाजप नेतृत्वांनाच संधी मिळाली. या शपथविधीनंतर पहिल्या विस्तारात संधी न मिळालेल्या शिंदे गट आणि भाजपा यामधील आमदारांकडुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता येत्या १९ डीसेंबरपासुन नागपुर येथे सुरू होणाऱ्या हिवाही अधीवेशनापुर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होइल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पुन्हा नव्याने पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात विधानसभेचे पाच आमदार आहेत. त्यात मदन येरावार, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, संजीवरेड्डी बोदकुलवार आणि नामदेव ससाणे यांचा समावेश आहे. त्याशिवाय अॅड. निलय नाईक यांना विधानपरिषदेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहा आमदारांची ताकद असलेल्या भाजपला मंत्रीपद देवुन भाजपची ताकद वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपकडुन होत आहे. याचवेळी केवळ मंत्रीपद नको तर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भाजपच्या वाट्याला देण्यात यावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भविष्यात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकी यामध्ये भाजपची ताकद वाढविण्यासाठी ही नियुक्ती आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांकडुन वरिष्ठांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा भाजपकडुन करण्यात आलेल्या या मागणीसंदर्भात पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार आणि कुणाची वर्णी मंत्रीपदी लागणार हे पाहण्यासाठी आगामी मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येरावारांसह, उईके, नाईकही शर्यतीत
जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी आगामी मंत्रीमंडळ विस्तारात जिल्हा भाजपचे नेते माजी मंत्री आमदार मदन येरावार यांना संधी मिळण्याची सर्वाधीक शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासोबतच आदीवासी चेहरा म्हणुन माजी आदीवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. अशोक उईके आणि बंजारा समाजाला डोळ्यासमोर ठेवुन अॅड. निलय नाईक यांच्यापैकी एकाला मंत्रीपद देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळणार की, एका पदावर समाधानी व्हावे लागेल आणि या शर्यतीत कुणाचे पारडे जड होणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
मोदींच्या दौऱ्यानंतर निर्णयाची शक्यता
राज्यात मंत्रीमंडळ विस्तारावरुन सर्वत्र तर्क वितर्क लावण्यात येत असतानाच देशाचे प्रतप्रधान नरेंद्र मोदी नागपुर येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होवुन अंतीम निर्णय होण्यची शक्यताही आता राजकीय जाणकार वर्तवित आहेत.
रवी भवन, नाग भवनात तयारी जोमात : नागपुर येथे पार पडणाऱ्या हिवाळी अधीवेशनाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. त्यात कॅबीनेट मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या रवी भवन परिसरातील बंगल्यांसोबतच राज्य मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या नाग भवनामध्येही सर्व बंगले तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याव्यतिरिक्त १८ मंत्री आहेत. अशा स्थितीत मंत्र्यांची सर्व निवासस्थाने तयार करुन ठेवण्यात येत असल्याने मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला आनखीनच दुजोरा देण्यात येत आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हात मजबुत
जिल्ह्यात शिवसेनेचे एकमात्र आमदार असलेले संजय राठोड हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे ते मंत्री असुन यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हात मजबुत झाले आहेत. त्याऊलट सहा आमदार असलेल्या भाजपी झोळी अद्याप रिकामीच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.