आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाचा राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवार दि. ९ मार्च रोजी जाहीर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येक घटकासाठी भरीव तरतुदींचा भरणा करण्यात आला आहे. या तरतुदींचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याला मिळणार आहे. असे असले तरी नदी जोड प्रकल्प आणि शक्तिपीठ महा मार्गाव्यतिरिक्त जिल्ह्याच्या वाट्याला विशेष असे काही आलेले दिसत नाही. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येवुन सरकार स्थापन केले. या सरकारने राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प तयार करण्यापुर्वी राज्यातील नागरिकांकडून त्यांच्या अपेक्षा यंदा विचारण्यात आल्या हे विशेष.
नागरिकांच्या अपेक्षा विचारात घेवुन सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि विदर्भातील तब्बल ६ जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. नागपुर आणि अमरावती विभागासाठी भरीव तरतुदी या अर्थसंकल्पात दिसुन आल्या. राज्यातील विविध क्षेत्रांसाठी आणि सर्व घटकांमधील नागरिकांसाठी काहीतरी या अर्थसंकल्पात देण्यात आले. महिला, मुली, विदयार्थी, युवक यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. शिक्षण आणि आरोग्य या महत्वाच्या क्षेत्रांसाठी वाढीव निधीची तरतुद झाली. राज्याचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी ही या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळणार, उर्वरीत भार शासन उचलणार याशिवाय आनेक घोषणा करण्यात आल्या. नागपुर गोवा महामार्ग जिल्ह्यातून जाणार असुन नदी जोड प्रकल्पांतर्गत जिल्ह्याला लाभ मिळणार आहे.
विमानतळ विकासाकडे अद्याप दुर्लक्ष : यवतमाळ शहरात विमानतळाची निर्मीती करुन बरीच वर्षे लोटली आहेत. मात्र या विमानतळाचा कुठलाही उपयोग जिल्हावासीयांना झालेला नाही. विकासासाठी एका खासगी कंपनीकडे हे विमानतळ सोपवण्यात आले आहे. मात्र त्या कंपनीनेही अद्याप काही उपाययोजना केलेल्या नाहीत. या अर्थसंकल्पामध्ये यवतमाळ विमानतळ त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.
टेक्सटाइल पार्कसाठी नियोजन नाही
जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसी परिसरात टेक्स्टाइल पार्क उभारणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर काही कामही सुरू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर सातत्याने या प्रमुख बाबीकडे दुर्लक्ष होत आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतुद होण्याची अपेक्षा होती. मात्र टेक्स्टाइल पार्ककडे यावेळी देखील दुर्लक्ष झाले.
उद्योग, पर्यटनासाठी जिल्ह्यात काही नाही
जिल्ह्यातील १६ तालुक्यात एमआयडीसी क्षेत्र तयार करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी नवे उद्योग यावे किंवा अस्तित्वात असलेल्या उद्योगांना भरारी घेता यावी यासाठी कुठलीही तरतुद जिल्ह्यासाठी झाली नाही. काही वर्षांपुर्वी पासुन जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र विकासासाठी कुठलीही तरतुद करण्यात आलेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात ती परिस्थिती कायम आहे.
पोहरादेवी विकासासाठी ५६५ कोटी
बंजारा समाजाची काशी पोहरा देवी तीर्थक्षेत्रासाठी ५६५ कोटी रुपयांच्या विकास कामांची घोषणा करुन निधीची तरतुद करण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रयत्न करुन हा निधी मंजुर करुन घेतला आहे. यापैकी काही कामांना सुरूवात करण्यात आली असुन उर्वरीत कामे लवकरच सुरू करुन पूर्णत्वास नेण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.