आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानपेटी:पुजाऱ्याला डांबून फोडली मंदिरातील दानपेटी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चक्क मंदिरातील पुजाऱ्याला डांबून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडत रोख रक्कम लंपास केली. ही धक्कादायक घटना शहरातील वाघापूर परिसरातील हिंगलजा माता अंबिका मंदिरात दि. १५ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास घडली. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी महावीर मंदिराचे गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला. पवन धोपेकर रा. हिंगुला अंबिका मंदिर यवतमाळ असे त्या पुजाऱ्याचे नाव आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. एकापाठोपाठ एक घरफोडीची घटना सातत्याने समोर येत आहे. अश्यात दि. १५ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी वाघापूर परिसरातील मंदिरांना टार्गेट करीत हिंगलजा माता अंबिका मंदिराचे चाईनाल गेट तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर एका पुजाऱ्याला डांबून दान पेटीतून रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी महावीर मंदिराचे चालन गेट तोडून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...