आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस तोडणी:सहा महिने मुलांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद‎

पुसद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऊस तोडणीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक ह्या‎ ठिकाणी मजूर स्थलांतरीत होत आहेत .‎ मुले शाळा सोडून सोबत येतात.‎ साधारणत: ऊस तोडणीवर सहा महिने‎ जावे लागत असल्याने मुलांच्या‎ शिक्षणाचे दरवाजे बंद होत असल्याची‎ व्यथा ऊस तोड कामगारांनी डॉ. आरती‎ फुपाटे यांच्याजवळ मांडली. दरम्यान,‎ ह्या व्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे‎ मांडू, अशी ग्वाही डॉ. फुपाटे यांनी दिली.‎ ‎ तालुक्यातील हजारो शेतकरी आहेत,‎ परंतू शेतीच्या नापिकी व झालेल्या‎ कर्जामुळे ऊस तोडणी शिवाय दुसरे‎ हाताला काम नाही. ह्या भागात रोज‎ मजुरीचे कोणतेही काम नसल्याकारणाने‎ ऊस तोडणीवर जावे लागते.‎

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या पार्श्वभुमीवर‎ सर्वत्र अमृत महोत्सवी वर्षे साजरे केल्या‎ जात आहे. असे असताना तालुक्यातील‎ हजारो मजूर मुला-बाळांसह गाव सोडून‎ ऊस तोडणीवर जात आहेत. तालुक्यात‎ त्यांच्या हाताला काम मिळत नाही.‎ होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना‎ ऊस तोडणीवर हजारो किलोमीटर दूर‎ जावे लागत आहे. माळपठार तसेच‎ संपूर्ण तालुक्यातील अनेक गावे ओस‎ पडली आहे. . ऊस तोडणीच्या कामावर‎ जाणाऱ्या मजुरांच्या पाल्याचे शिक्षण‎ सुद्धा पूर्ण होईल, याची हमी घेणे गरजेचे‎ आहे. यावेळी त्यांच्यासोबात सुरेश‎ सिडाम, प्रदीप इंगळे, उबाळे, बुरकुले,‎ स्वप्निल इंगळे, संतोष पांडेव, इतर‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎‎ कामगारांना रात्री बे रात्री ऊस तोडून‎ वाहन भरावे लागते. त्यावेळी त्यांची‎ लहान मुलांचे पाळणे ट्रकच्या बाजूच्या‎ खुंटीला लटकवलेले असतात.‎

बातम्या आणखी आहेत...