आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलटला:चालकाचे नियंत्रण सुटल्याने अॅपे उलटला

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस दारव्हा मार्गावरील चिंचोली कळसा मधोमध असलेल्या भोलेनाथ मंदिराजवळील वळणावर दिग्रस वरून दारव्हाकडे भरधाव जाणाऱ्या अॅपे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला अॅपे पलटी झाला. या अपघात ८ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असुन उर्वरीत तीन जण जखमी झाले. ही घटना गुरूवार दि. १५ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास घडली.

मानोरा तालुक्यातील उमरी येथे देवदर्शन करून काही जण अॅपे क्रमांक एमएच १६ एबी ५९५८ ने दिग्रस मार्गे दारव्ह्याकडे जात होते. त्यातच भोलनाथ मंदिराजवळील वळण रस्त्यावर अॅपे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अॅपे पलटी झाला. या अपघातात दारव्हा तालुक्यातील साजेगाव येथील ८ वर्षाचा गौरव उमेश राठोड या मुलाच्या हाताला गंभीर इजा पोहचली. तर सपना उमेश राठोड (वय-३५), बेबी तारासिंग पवार (वय-५५) तर लोणी ,ता.यवतमाळ येथील बेबी लालसिंग राठोड (वय-६०) यांना हातापायाला जबर मार लागला. या घटनेची माहिती पडताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमीला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...