आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह:"हप्ता देतो तरी ट्रक लावतात' अशा  घोषणा देत जप्त ट्रकसह चालक फरार

उमरखेड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयात गुरुवारी दोन तलाठ्यांनी जिवाची पर्वा न करता अवैधरीत्या ढब्बर घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडून कार्यालयात आणले. मात्र त्या ढब्बर चालकाने जोरजोराने घोषणा देऊन अक्षरशः कार्यालयातून ट्रक पळवून नेला. यावेळी त्याने दिलेल्या घोषणेत,”हप्ता देतो तरी ट्रक लावतात”अशा घोषणा दिल्याने तहसीलदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, सध्या तालुक्यातील अवैध रेती प्रकरण उजेडात असताना आणि रेती घाट बंद झाले असताना सुद्धा तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध रेती साठे साचलेले किंवा जाणून-बुजून साठवलेले आढळून येत आहे.

अशा परिस्थितीत गुरुवारी विडुळ गावानजीक तलाठी सानप व वाकोडे यांनी दुपारी दोन वाजता दरम्यान एमएच-२७-एक्स ०२२६ नंबरचा ढब्बरचा ट्रक पकडला. अवैधरीत्या गौण खनिजाची चोरी तसेच रितीसाठे यावरून रेती तस्करी चोरी करणारे रॅकेट उमरखेड तालुक्यात प्रचंड प्रमाणात फोफावले आहे. ढब्बरचा जो ट्रक पकडण्यात आला, त्याला रितसीरपणे दुपारी २ वाजता जमा करण्यात आले. ट्रक लावल्यानंतर तहसील कार्यालयातून हा ट्रक चालक संतोष चंदेवाड यांनी लावल्यानंतर तात्काळ संतोष चालकाने आम्ही महसूल प्रशासनाला हप्ता देतो, तुम्ही चोर आहात, तरी ट्रक लावता अशा, घोषणा देत ट्रक तहसील कार्यालयाचे आवारातून फाटक तोडीत त्यांनी पळून नेला. े. या प्रकरणी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांचे पथक काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

त्यांना सोडून देतात
अवैध रेती घाटावरून आणि अवैध गौण खनिज उपसल्या वरून दररोज उमरखेड तहसील कार्यालयात एक ना अनेक वाहने ताब्यात घेण्यात येतात. मात्र एकाही वाहनावर कार्यवाही होताना दिसत नाही. गुरूवार, दि. १० जूनला सकाळी दोन रेतीचे वाहन ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून त्यांना सोडून देण्यात आल्याची चर्चा या ट्रक पळवल्या प्रकरणामुळे समोर आली आहे.

काय कारवाई झाली हे मात्र गुलदस्त्यातच
आठ दिवसा अगोदर उमरखेड तालुक्यातील दोन रेती घाटाचा कार्य संपत असताना याच महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची तक्रार झाली. उमरखेड अधिकार्‍याचे उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे यांनी अखेरच्या तालुक्यात दोन रेती घाटावर तपासणी केली असता, तिथे महसूल प्रशासनाचे अधिकारी हे गौण खनिज आणि रेती तस्करी यामध्ये गुंतले असल्याचे आढळून आले. अक्षरशः एका रेती घाटावर ट्रेझर बोट जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या घाटावरून रेती साठा साठवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता त्या प्रकरणात काय कारवाई झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

बातम्या आणखी आहेत...