आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील बालकांचा प्रतिसाद:जिल्ह्यात ठिकठिकाणी पोळा सणाचा उत्साह

पांढरकवडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा दोन वर्षाचा काळ वगळता प्रगती मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तान्हा पोळ्याचा बालकांचा पालकांसह प्रचंड प्रतिसाद मिळाला दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या पोळ्यात आयोजनस्थळ नंदीसह आलेल्या बालकांनी व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांनी गजबजले होते.

दोन वर्षाचा कोरोना काळात सर्व सणांवर संक्रांत आली होती. त्यातून तान्हा पोळाही सुटलेला नव्हता मुलांची खबरदारी म्हणून मागील वर्षीची प्रगती मंडळाने तान्हा पोळ्याचे आयोजन टाळले होते. मात्र यंदा दोन वर्षांनंतर तान्हा पोळा भरविला. बालकांचा प्रतिसाद कसा मिळतो याकडे आयोजकांचे लक्ष लागले होते मात्र आयोजनाच्या १ तासातच संपुर्ण आयोजनस्थळ नंदीसह आलेल्या बालकांनी गजबजून गेले. मुला मुलींनी विविध आकर्षक वस्त्र परिधान करून व नंदी बैलांना उत्कृष्टपणे सजवून आयोजनस्थळी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रगती मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत पाटील, उपाध्यक्ष संतोष चिंतावार, सचिव सुभाष बडवे, कोषाध्यक्ष प्रकाश उपलेंचवार, सहसचिव विजय पोद्दार, प्रभुलाला जयस्वाल, बाळ इंगळे या पदाधिकाऱ्यांसोबत ईतर संचालकही आपले पुर्ण योगदान देतात, मंडळा बाहेरील आयुष बडवे, सोहम बडवे, रत्नाकर गेडाम, यांचेही योगदान महत्वाचे असते. यंदाचे मुख्य नंदीबैल पुजन मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांचे हस्ते झाले. त्यानंतर त्यांचे हस्ते तोरण कापून पोळा फुटल्याचे जाहिर करण्यात आले.

सावरगड येथे पोळा सण आनंदात साजरा
तालुक्यातील सावरगड येथे ग्रामस्थांच्या वतीने पोळा हा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. शेतकरी व ऋषभ राजा यांच्या स्नेह वृद्धीचा सण म्हणून बैलपोळ्याची ओळख आहे.

गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्यांना महादेव मंदिराचे दर्शन घडवतात. त्यानंतर वेशीवर बांधलेल्या आंब्याच्या तोरणाखालुन काढून पोळा फोडला जातो. शेतकरी सर्वप्रथम आपल्या बैलांना स्व:ताच्या घरी आणून ओवाळून त्यांची पूजा करत पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. सावरगड येथील शेतकरी गोविंदराव मेंढे यांच्या कडील बैल जोडीची किशोर पूनवंतवार यांनी पूजा केली.

विवेकानंद विद्यालयातील तान्हा पोळ्यात बालगोपाळांचा सहभाग यवतमाळ
कृषीप्रधान भारत देशामध्ये शेतीत राबणारा शेतकरी आणि त्याच्यासोबत कष्ट करणारा बैल यांचा पोळा हा सण महत्त्वाचा समजला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बालगोपाळांचा तान्हा पोळा साजरा होतो. यानिमित्त विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयात मुलांनी शेतकऱ्याची वेशभूषा करून मातीचे बैल शाळेतआणले होते. नटून-थटून आलेल्या या बालगोपाळांनी आपापल्या बैलजोडी समोर पोळ्याचे आणि बैलाच्या कष्टाचे महत्त्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे आणि पर्यवेक्षक स्वाती जोशी यांच्यासह सर्व शिक्षक बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विवेक कवठेकर यांनी शेतीशी आणि मातीशी नातं सांगणाऱ्या पोळा सणाचे महत्त्व स्पष्ट करून शेतीत चालणाऱ्या प्रक्रियांची माहिती दिली. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी ज्याच्या विश्वासावर शेती करतो त्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा उद्देश असून या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शेतीशी आणि मातीशी नातं जोडून ठेवावं असे आवाहनही त्यांनी केले. मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनीही विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. संचालन दिनेश गहरवार यांनी तर आभार प्रदर्शन महेश कोकसे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...